Pimpri: तुमच्या परिसरात किती रुग्ण आहेत? जाणून घ्या तुमच्या भागातील आजपर्यंतची रुग्ण संख्या

Pimpri-chinchwad: How many patients are there in your area? Find out the number of patients in your area till date आजपर्यंत शहरातील 1557 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 587 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, 944 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहराला कोरोनाने विळखा घातला आहे. आजपर्यंत शहरातील 1557 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 587 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, 944 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

सक्रिय रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या मोठी आहे. ही दिलासादायक बाब मानली जात आहे. तर, 26 जणांचा मृत्यू झाला आहे.

भागनिहाय रुग्णांची संख्या, बरे झालेले रुग्ण आणि मृतांची संख्या

ताथवडे- एकूण रुग्ण 2. दोनही रुग्ण पूर्णपणे बरे
पुनावळे- एकूण 5 रुग्ण. पाचही रुग्ण बरे
किवळे- एकूण 18 रुग्ण. 16 रुग्ण बरे, 2 जणांवर उपचार सुरु
रावेत- 2 रुग्ण, 1 रुग्ण बरे, 1 वर उपचार सुरु
वाल्हेकरवाडी- एकूण 8 रुग्ण, 5 रुग्ण बरे, 2 उपचार सुरु तर एकाचा मृत्यू
चिंचवड- एकूण 398 रुग्ण. 292 रुग्ण ठणठणीत. 105 जणांवर उपचार सुरु, 1 मृत्यू
पिंपरी- एकूण 285 रुग्ण. 152 झाले बरे. 129 जणांवर उपचार सुरु, 4 जणांचा मृत्यू
भोसरी-एकूण 90 रुग्ण. 60 रुग्ण झाले बरे. 27 जणांवर उपचार सुरु. तिघांचा मृत्यू.
मोशी- एकूण 21 रुग्ण. 15 जण झाले बरे, 5 जणांवर उपचार सुरु, 1 मृत्यू
चऱ्होली- एकूण 20 रुग्ण. 18 पूर्णपणे ठणठणीत. एकावर उपचार सुरु तर 1 मृत्यू
दिघी- एकूण 24 रुग्ण. 13 झाले बरे. 10 जणांवर उपचार सुरु, 1 मृत्यू
बोपखेल- एकूण 2 रुग्ण. 1 बरे झाला. तर, एका रुग्णावर उपचार सुरु
दापोडी- एकूण 91 रुग्ण. 33 जण झाले बरे. 52 जणांवर उपचार सुरु तर सहा जणांचा मृत्यू.
पिंपळे सौदागर- एकूण 13 रुग्ण. 9 रुग्ण ठणठणीत. चार जणांवर उपचार सुरु
काळेवाडी- एकूण 44 रुग्ण. 17 ठणठणीत बरे. 27 जणांवर उपचार सुरु


रहाटणी- एकूण 6 रुग्ण होते. सहाही रुग्ण बरे झाले आहेत.
वाकड- एकूण 59 रुग्ण. 43 रुग्ण झाले बरे. 15 जणांवर उपचार सुरु, 1 रुग्णाचा मृत्यू झाला
थेरगाव – एकूण 25 रुग्ण. 15 जण पूर्णपणे झाले बरे. 9 रुग्णांवर उपचार सुरु तर एकाचा झाला मृत्यू.
चिखली- एकूण 23 रुग्ण. 13 जण झाले बरे. 10 जणांवर उपचार सुरु.
ताम्हणेवस्ती- एकूण 6 रुग्ण. 3 रुग्ण झाले बरे तर तिघांवर उपचार सुरु
कासारवाडी- एकूण 13 रुग्ण. 5 झाले बरे तर सात जणांवर उपचार सुरु. एका रुग्णाचा मृत्यू
आकुर्डी- एकूण 145 रुग्ण. 94 बरे झाले. 50 जणांवर उपचार सुरु तर एका रुग्णाचा मृत्यू
निगडी- एकूण 23 रुग्ण. 4 रुग्ण ठणठणीत तर 19 रुग्णांवर उपचार सुरु.
संभाजीनगर- एकूण 7 रुग्ण. सातही रुग्ण ठणठणीत.
रुपीनगर- एकूण रुग्ण 42. 39 जण झाले बरे. एकावर उपचार सुरु तर दोघांचा मृत्यू
यमुनानगर – एकूण 9 रुग्ण, 9 रुग्णांवर उपचार सुरु
तळवडे- एकूण 7 रुग्ण. 6 रुग्ण झाले बरे. एका रुग्णावर उपचार सुरु
नवीन सांगवी- एकूण 13 रुग्ण. 10 रुग्ण ठणठणीत तर 3 जणांवर उपचार सुरु.
जुनी सांगवी- एकूण 66 रुग्ण. 27 जण ठणठणीत. 38 जणांवर उपचार सुरु. एकाचा मृत्यू.
फुगेवाडी- एकूण 2 रुग्ण. दोनही रुग्ण ठणठणीत
पिंपळे गुरव- एकूण 19 रुग्ण. 14 जण झाले बरे. 4 जणांवर उपचार सुरु तर एकाचा मृत्यू
पिंपरी वाघेरे- एकूण 5 रुग्ण. पाचही झाले बरे
पिंपळे निलख- एकूण 3 रुग्ण. 1 रुग्ण ठणठणीत, दोघांवर उपचार सुरु

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.