Constable recruitment: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय शिपाई भरती मधील पाच परीक्षार्थींना गैरप्रकार केल्याप्रकरणी अटक

एमपीसी न्यूज: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय शिपाई भरती मधील पाच परीक्षार्थींना गैरप्रकार केल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट 4 यांनी अटक केली आहे.(Constable recruitment) त्यांच्याकडून 76 मोबाईल हँडसेट 66 इलेक्ट्रॉनिक स्पाइड डिव्हाइसेस, 22 वॉकीटॉकी संच, 11 वॉकी टॉकी चार्जर व 11 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.अशी माहिती डॉक्टर काकासाहेब डोळे, पोलीस उप -आयुक्त मुख्यालय गुन्हे पिंपरी चिंचवड यांनी दिली आहे.

या प्रकरणी ज्ञानेश्वर चंदेल वय 29 वर्षे रा. मु. पो  लोघेवाडी,  पो. खामगाव, ता. बदनापूर जिल्हा जालना, कार्तिक उर्फ वाल्मिक जारवाल, वय 23 वर्षे, रा. मु. पो. एक बुर्जी, ता. गंगापूर जिल्हा औरंगाबाद, अरुण पवार वय 26 वर्षे रा अंथुरण, पिंपरी ता. व जिल्हा बीड, अर्जुन देवकाते, वय 28 वर्षे, रा. मु पो कवडगाव, ता वडवणी जिल्हा बीड व अमोल पारेकर, वय 22 वर्षे, रा. काळेची वाडी पो भोगलवाडी ता धारूर जिल्हा बीड ह्या पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत 720 जागेसाठी पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा 19 ऑगस्ट 2021 ला 3 ते 4.30 वा चे दरम्यान विविध सहा जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर घेण्यात आली होती.(Constable recruitment) तसेच त्यातील पात्र उमेदवारांची 19 डिसेंबर ते 21 डिसेंबरला राखीव बल गट क्रमांक एक रामटेकडी हडपसर पुणे येथे मैदानी चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. त्यातील 1,070 3 जानेवारी ते 5 जानेवारी 2022 पर्यंत प्रति दिवस 380 उमेदवार याप्रमाणे मूळ कागदपत्र पडताळणी करीता निगडी पोलीस मुख्यालय, पिंपरी चिंचवड येथे बोलविण्यात आले होते.

MPC News Podcast 25 August 2022 : ऐका… आजचे एमपीसी न्यूज पॉडकास्ट!

त्यादरम्यान 4 जानेवारी 2022 रोजी उमेदवार जीवन काकरवाल, वय 23 वर्षे रा. मु पो रघुनाथपूरवाडी, का वैजापूर जिल्हा औरंगाबाद याचे मूळ कागदपत्र पडताळणी करताना त्याच्या फॉर्म वरील फोटो आणि स्वाक्षरी यामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आले.(Constable recruitment) त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने मैदानी परीक्षा ही डमी परीक्षाार्थी मार्फत दिली असल्याचे व लेखी परीक्षेसाठी इलेक्ट्रॉनिक्स स्पाय डिव्हाईस वापरून लेखी परीक्षा दिल्याचे कबूल केले. तसेच अधिक चौकशीमध्ये रवींद्र गुसिंगे व चरणसिंग काकरवाल यांनी देखील गैरप्रकार केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध 4 जानेवारी 2022 ला निगडी पोलीस ठाण्यात भादवि कलम 420 व इतर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट 4 पिंपरी चिंचवड हे करीत आहे.

 

 

पिंपरी-चिंचवड पोलीस शिपाई भरती 2019 चे मैदानी व लेखी परीक्षेमध्ये गैरप्रकार केले प्रकरणी निळी पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये पूर्वी 51 आरोपी अटक केले होते.(Constable recruitment)त्यापैकी 26 अटक आरोपी हे पिंपरी-चिंचवड पोलीस भरती मध्ये उमेदवार होते. तसेच सदर गुन्ह्यांमध्ये 75 हुन अधिक आरोपी हे पाहिजे आरोपी म्हणून निष्पन्न करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये 12 हुन अधिक पाहिजे आरोपी हे पात्र न झालेले उमेदवार होते. सदरचे पाहिजे आरोपींचा शोध घेणे कामी पोलिसांनी तीन अधिकारी व बारा पोलीस आमदार यांची चार पदके तयार करून त्यांना औरंगाबाद जालना व बीड जिल्ह्यात पाठवण्यात आले होते.

 

या पथकांनी आरोपी ज्ञानेश्वर चंदेल, रा. जिल्हा जालना व रा. जिल्हा औरंगाबाद त्यांना 22 ऑगस्ट 2022 ला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. तसेच अरुण पवार, रा. जिल्हा बीड, अमोल पारेकर, रा. जिल्हा बीड यांचा शोध घेऊन त्यांना 22 ऑगस्ट 2022 ला ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे.(Constable recruitment) तसेच त्यांच्याकडून 76 मोबाईल हँडसेट, 66 इलेक्ट्रॉनिक स्पाय डिव्हाइसेस, 22 वॉकीटॉकी संच, 11 वॉकी टॉकी चार्जर व 11 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आले आहे. याशिवाय 100 हून जास्त ब्ल्यू टूथ इयर बग्ज, मोबाईल फोन व साई डिव्हाईसेस लपवून नेण्यासाठी वापरलेले बनियान, टी-शर्ट्स, अंडरवेअर, सपोर्टर वेगवेगळ्या कंपन्यांचे सिम कार्ड जप्त करण्यात आलेली आहेत.

 

या गुन्ह्याच्या तपासामध्ये औरंगाबाद जालना व बीड या जिल्ह्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या व परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्या सहा टोळ्या उध्वस्त केल्या असून बीड, औरंगाबाद, जालना, नागपुर, अमरावती, अहमदनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे 20 हून अधिक वेळा वेगवेगळ्या तपास पथकांनी आरोपी राहत असणाऱ्या दुर्गम परिसरामध्ये  जाऊन प्रतिकूल परिस्थितीमध्ये आरोपींना अटक केली आहे.(Constable recruitment) या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट 4 पिंपरी चिंचवड, सायबर सेल तांत्रिक विश्लेषण विभाग, पिंपरी चिंचवड व विशेष पथकाचे पोलीस अधिकारी / पोलीस अंमलदार यांच्या यांच्या उल्लेखनीय कामगिरीतून करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.