Omicron News : पिंपरी – चिंचवड शहरात ‘ओमायक्रॉन’चा पहिला बळी?

पिंपरी - चिंचवड शहरात ओमायक्राेन पाॅझिटिव्ह रुग्णाचा ह्रदयविकाराने मृत्यू , शहरात एकच खळबळ

एमपीसी न्यूज – कोरोनाचा नवीन विषाणू असलेल्या ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग झालेला पिंपरी-चिंचवड शहरातील पहिला बळी गेला आहे. हा रुग्ण नायजेरियातून शहरात आला होता. वायसीएममध्ये उपचार घेत असताना मंगळवारी (दि.28) ह्दयविकाराच्या झटक्यामुळे मंगळवारी निधन झाले. आज त्यांचा ओमायक्रॉन’चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. 52 वर्षीय वय असणारी ही संबंधित व्यक्ती गेल्या 13 वर्षांपासून डायबेटीसची रुग्ण होती. 

आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे. केंद्र व राज्य शासनाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सूचित केले आहे. त्यानुसार महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या अनुषंगाने महापालिकेतर्फे तपासणी मोहीम सुद्धा सुरू आहे.

आज शहरात ओमायक्रॉनचे नवीन 3 रुग्ण आढळले असून त्यात 2 महिला, एक पुरुष रुग्णाचा समावेश आहे. त्यापैकी 1 रुग्ण नायजेरियातून आला असून 2 संपर्कातील आहेत. त्यातील नायजेरियातून आलेल्या रुग्णाचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचा ओमायक्रॉन’चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे ओमायक्रॉन’चा शहरातील पहिला बळी ठरला आहे.

ओमायक्रॉनच्या 11 सक्रिय रुग्णांवर उपचार; 15 संसर्गमुक्त

आजपर्यंत परदेशातून शहरात आलेले व त्यांच्या संपर्कातील अशा 1591 जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील 1495 जणांचे अहवाल प्राप्त झाले. परदेशातून आलेले 32 तर त्यांच्या संपर्कातील 28 जण पॉझिटीव्ह आले. तर, 1437 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले. परदेशातून आलेल्या 32 पॉझिटीव्ह रुग्णांपैकी 14 जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली.

संपर्कातील 28 पॉझिटीव्ह रुग्णांपैकी 11 ओमायक्रॉन पॉझिटिव्ह होते. तर, रँन्डम तपासणीत 1 रुण ओमायक्रॉन पॉझिटीव्ह आला. 15 जण ओमायक्रॉन संसर्गमुक्त झाले आहेत. तर, 11 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.