Visarjan Ghat : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विसर्जन घाटांची महापालिका आयुक्तांकडून पहाणी

एमपीसी न्यूज : गणेशोत्सवाच्या दृष्टीने आवश्यक सेवा सुविधा पुरवण्यासाठी महापालिका यंत्रणा सज्ज असून गणेश विसर्जन घाटांच्या (Visarjan Ghat) स्वच्छताविषयी सुरु असलेल्या अंतिम टप्प्यातील कामांची स्थळ पाहणी मंगळवारी (दि.30) आयुक्त शेखर सिंह यांनी केली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता संजय खाबडे, संजय कुलकर्णी, डॉ. ज्ञानदेव जुंधारे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहीवाल, उप आयुक्त अजय चारठाणकर, रविकिरण घोडके तसेच जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी या पाहणी दौऱ्यामध्ये सहभागी होते.

शहरात उत्साहाच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा होणार असून मोठ्या प्रमाणामध्ये भाविक गणेश विसर्जनसाठी घाटावर येण्याची शक्यता आहे. शिवाय गणपतीची प्रतिष्ठापना करताना तसेच विसर्जनासाठी निघणाऱ्या मिरवणुकांची संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे.(Visarjan Ghat) या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर जय्यत तयारी करत आहे. सुरक्षा, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने ही पाहणी करण्यात आली.

Spartan monsoon league : कल्याण क्रिकेट क्लब, स्कॉर्पियन्स् क्रिकेट क्लब संघांची विजयी कामगिरी !!

पाहणी करण्यात आलेल्या प्रमुख स्थळांमध्ये ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत वाल्हेकरवाडी येथील जाधव घाट, चिंचवडगाव थेरगाव पूल घाट, ग क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पिंपरी येथील सुभाषनगर झुलेलाल घाट, ड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत वाकड येथील विसर्जन घाट, ह क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत वेताळ महाराज उद्यान शेजारील सांगवी घाट, क क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत इंद्रायणी नदीवरील मोशी घाट यांचा समावेश आहे.  तसेच इ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असलेल्या मोशी येथील खाण या भागांचा समावेश होता.

यावेळी गणेश विसर्जन घाटांवर दिशा दर्शक व स्थळ दर्शक फलक लावण्यात यावे, विसर्जन घाटांवरील निर्माल्यकुंडांचे ठिकाणे निश्चित करून तसे फलक लावावेत. जीवरक्षकांची नेमणूक करून मध्यवर्ती नियंत्रण कक्षाशी समन्वय साधावे, अग्निशमन यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित ठेवावी, नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी, विसर्जन घाटांवर सुशोभीकरण करण्यात यावे,(Visarjan Ghat) अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या. यावेळी गणेश मिरवणूक मार्ग तसेच विसर्जन घाटावर महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याची खबरदारी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.