Pimpri: कापड व्यापारी जयराम दुधानी यांचे कोरोनामुळे निधन

Pimpri: Cloth trader Jairam Dudhani dies due to corona जयराम दुधानी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर 2 जुलैपासून चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता.

एमपीसी न्यूज – पिंपरी कॅम्पमधील प्रसिद्ध कापड व्यापारी जयराम हिरानंद दुधानी (वय 61) यांचे कोरोनामुळे मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

जयराम दुधानी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर 2 जुलैपासून चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. ऑक्सिजन सिलिंडरची मागणी करणारा त्यांचा रुग्णालयातील व्हिडिओही समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता. 2 जुलैपासून सुरु असलेली कोरोना विरोधातील त्यांची लढाई अखेर संपली आहे.

जयराम दुधानी यांचे कॅम्प परिसरात कपड्याचे दुकान होते. सिंधी समाजातील गरजू नागरिकांना मदत करण्यात ते पुढे असत. सामाजिक कार्यात देखील ते अग्रेसर होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.