Pimpri Corona News: महिन्याभरात 3 लाख 40 हजार नागरिकांच्या चाचण्या, 52 हजार 114 पॉझिटीव्ह, फक्त 33 रुग्णांमध्ये लक्षणे

एमपीसी न्यूज – कोरोनाची तिसरी लाट सुरु झाल्यापासून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 15 डिसेंबर 2021 ते 24 जानेवारी 2022 या काळात शहरातील 3 लाख 39 हजार 744 नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी 52 हजार 414 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. यामध्ये केवळ 33 रुग्णांना तीव्र लक्षणे होती. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.

मध्यम लक्षणे असलेले 405 रुग्ण महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये तर सौम्य लक्षणे असलेले केवळ 859 रुग्ण महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेले आहेत. उर्वरित सर्व कोविड रुग्णांमध्ये कसल्याही प्रकारची लक्षणे नसल्यामुळे महापालिकेच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली घरीच राहून उपचार घेत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा मोठा फायदा झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनाची लागण झाली तरी प्रकृती गंभीर होत नाही.

17 हजार 314 नागरिकांनी घेतला बुस्टर डोस 

केंद्र सरकारने ठरवुन दिलेल्या नियोजनानुसार पिंपरी- चिंचवड शहरात आजअखेर 17 लाख 59 हजार 191 नागरिकांनी डोसची पहिली मात्रा घेतली. तर, 14 लाख 57 हजार 933 इतक्या नागरिकांनी डोसची दुसरी मात्रा घेतली आहे. याशिवाय 17 हजार 314 नागरिकांनी बुस्टर डोसची मात्रा घेतलेली आहे. तसेच 15 ते 18 वयोगटातील 48 हजार 440 मुला-मुलींनी डोसची मात्रा घेतलेली आहे. या महत्वाकांशी लसीकरण मोहीमेचा प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे तसेच कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुयोग्य नियोजन करुन जनजागृती केल्यामुळे आज शहरामध्ये कोरोनाचा इतक्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होवून सुध्दा रुग्णांलयांमध्ये दाखल होणाऱ्या कोविड रुग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे. ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होवूनही रुग्णांना रुग्णालयीन उपचार घेण्याची सुध्दा गरज पडत नाही. यावरुन लसीकरण हाच यावर रामबाण उपाय असून लसीकरण हेच कोरोना प्रादुर्भाव न होण्यासाठी कवच असल्याचे आकडेवारी वरुन स्पष्ट होत आहे.

त्यामुळे शहरातील ज्या नागरिकांनी अद्याप लसीकरण करुन घेतलेले नाही. अशा नागरिकांना स्वयंस्फृर्तीने आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रात जावून लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.