Pimpri : माजी महापौर संजोग वाघेरे यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट; मावळमधून उमेदवारी मिळणार?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराचे (Pimpri)माजी महापौर संजोग वाघेरे यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मावळमधून वाघेरे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असून येत्या दोन दिवसात ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जाते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला हा धक्का मानला जात आहे.

PMPML : पर्यटनाला जा पीएमपी बस घेऊन; शैक्षणिक संस्थांना 25 टक्के सवलत

संजोग वाघेरे हे शहराचे महापौर होते. (Pimpri)राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षही ते होते. त्यांच्या पत्नी उषा वाघेरे यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर वाघेरे यांनी उपमुख्यंमत्री अजित पवार यांना समर्थन दिले होते.

त्यांच्या पाठिशी उभे राहिले होते. वाघेरे हे मावळमधून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. पार्थ पवार यांच्यामुळे मागीलवेळी वाघेरे यांची संधी गेली होती. आता अजित पवार हे महायुतीत गेले आहेत. त्यामुळे महायुतीकडून शिवसेनेला मतदारसंघ सुटण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीत मावळ मतदारसंघ ठाकरे गटाला सुटणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच वाघेरे यांनी ठाकरे यांनी भेट घेतली आहे. वाघेरे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असून येत्या दोन दिवसात ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जाते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.