Pimpri: दागिने चोरून परस्पर सोनाराकडे ठेवले गहाण, दोघांना अटक

एमपीसी न्यूज –  घर बंद असताना दुसऱ्या चावीने कुलूप (Pimpri)उघडून कपाटातील दागिने काढून ते परस्पर सोनाराकडे गहाण ठेवले आहेत. ही घटना जुलै 2023 ते 3 मार्च 2024 या कालावधीत पिपंरी येथे घडली आहे,
याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी  महिला आरोपी (वय 19 रा. काळेवाडी) (Pimpri)व आकाश धनंजय कुलकर्णी (वय 23 रा. काळेवाडी) यांना अटक केली आहे,.याप्रकरणी मंजीतराम सुदर्शनराम भारती (वय 39 रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Mp Dr. Amol Kolhe: खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मांडला कार्य अहवाल, वाचा कोणती कामे मार्गी लागली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी हे घरी नसताना महिला आरोपी  ने तिच्याकडे असलेली चावीने घराचे कुलुप उघडले व कपाटातील 15 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने परस्पर घेवून जात ते सोनाराकडे गहाण ठेवले. हा सारा प्रकार उघड होताच फिर्यादीने पिपंरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पिंपरी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पिंपरी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.