Pimpri News: चिंता मिटली ! पवना धरणात 78.87 टक्के पाणीसाठा

Pimpri News: 78.87 per cent water storage in Pavana dam पावसाळ्याचे जून, जुलै दोन महिने ओढ दिल्यावर ऑगस्टच्या सुरुवातीपासून पावसाला सुरुवात झाली आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी होत आहे. गेल्या 24 तासांत धरण क्षेत्रात 23 मिली मीटर पावसाची नोंद झाली असून साठ्यात 1.86 टक्यांनी वाढ झाली आहे. तर, 1 जूनपासून 1266 मिली मीटर पाऊस झाला असून 43. 58 टक्यांनी धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. एकूण 78.87 टक्के पाणीसाठा झाला आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची भिस्त पवना धरणावर अवलंबून आहे. पावसाळ्याचे जून, जुलै दोन महिने ओढ दिल्यावर ऑगस्टच्या सुरुवातीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. काही दिवस धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली. यामुळे शहरवासीयांवरील अधिकच्या पाणीकपातीचे संकट टळले आहे.

धरणातील पाणी साठ्यात वाढ झाल्याने मावळ, पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांची पाण्याची चिंता संपली आहे.

पवना धरणातील पाणी साठ्याची आजची आकडेवारी

गेल्या २४ तासांत झालेला पाऊस – 23 मि.मि.
1 जूनपासून झालेला पाऊस – 1266मि.मि.
गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत झालेला एकूण पाऊस – 3121 मि मी
धरणातील सध्याचा पाणीसाठा – 78.87 टक्के
गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा – 99.70 टक्के
गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ – 1.86 टक्के
1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ – 43.58 टक्के

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.