Pimpri News : श्रींची मूर्ती विसर्जन व संकलन केंद्राचा संदीप वाघेरे यांचा स्तुत्य उपक्रम

एमपीसी न्यूज –  लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने पिंपरी येथे मूर्ती विसर्जन व संकलन केंद्राचे आयोजन करण्यात आले आहे.

याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्व घाटांवर मूर्ती विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली. परंतु, नागरिकांच्या भावनेचा विचार करत पिंपरी परिसरातील सर्वांसाठी मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी जनसंपर्क कार्यालयसमोरील जागेमध्ये गणेश मूर्ती विसर्जन व संकलन केंद्राची सुविधा देण्यात आली आहे.

या केंद्रामध्ये गणरायाची आरती करण्यासाठी 25 X 60 आकाराचा मंडप उभारण्यात आला आहे. तसेच 6  मीटर लांबीचे पाण्याचे दोन हौद तयार करण्यात आले आहेत. तसेच लोकभावनेचा आदर करून केंद्रामध्ये संकलित व विसर्जित करण्यात आलेल्या गणेशमूर्ती हिंजवडी येथे महापालिकेने ठरवून दिलेल्या खाणीमध्ये विसर्जित केल्या जाणार आहेत.

आतापर्यंत जवळपास 700 पेक्षा अधिक भाविकांनी या योजनेचा लाभ घेतला असून पिंपरीगाव व परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. शनिवार दिनांक 18 व अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी 8 ते राञी 10 वाजेपर्यंत नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे. तसेच विसर्जन केंद्रांवर येताना नागरिकांनी सर्व शासकीय नियमांचे पालन करावे, असे आवाहन संदीप वाघेरे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.