Pimpri : जाब विचारला म्हणून व्यापाऱ्यास मारहाण करणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज – गाडीचा कट लागल्याने (Pimpri) त्याचा जाब विचारला असता सात जणांनी मिळून एका व्यापाऱ्याला मारहाण करून त्यांच्या वाहनाचे नुकसान केले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 21) रात्री जमतानी कॉर्नर, पिंपरी येथे घडली.

प्रतीक जेम (वय 19), निखिल कांबळे (वय 18), ओंकार खैरमोडे (वय 23) या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह आदित्य उमाप, स्वप्नील चंदनशिवे, आदित्य जाधव आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नितीन गुरुमुखदास नागदेव (वय 31, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune News : वर्षानुवर्षे गायरान जमिनीवर वास्तव्यास असलेल्या गोरगरिबांना बेघर करू नका; रासपची मागणी  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास (Pimpri) जमतानी कॉर्नर पिंपरी येथून जात असताना आरोपींनी फिर्यादींच्या गाडीला कट मारला. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपींनी गाडी नीट चालवता येत नाही का, असे म्हटले. या कारणावरून आरोपींनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी व सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. त्यांनतर फिर्यादींच्या गाडीची तोडफोड करून नुकसान केले. याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.