Bhosari News : नीरज चोप्राच्या यशाबद्दल संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल येथे खेळाडू, प्रशिक्षकांचा जल्लोष

एमपीसी न्यूज – नीरज चोप्राने ॲथलेटिक्स खेळातील भालाफेक क्रीडा प्रकारात टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक जिंकले. भोसरी, इंद्रायणी नगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल येथे ट्रॅक फॉर्च्युन स्पोर्टस क्लबच्या खेळाडूंनी आणि क्रीडा प्रशिक्षकांनी फटाके आणि घोषणा देत नीरज चोप्राच्या विजयाचा आज (रविवारी) जल्लोष साजरा केला.

यावेळी प्रशिक्षक संदीप गायखे आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते  मिलिंद झोडगे यांनी उपस्थित खेळाडूंना खेळाची माहिती आणि ऑलिम्पिकचा इतिहास या विषयी माहिती देऊन त्यांना खेळाचा ॲथलेटिक्स खेळाचा सराव याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी महापालिकेचे माजी क्रीडा सभापती तथा  नगरसदस्य तुषार हिंगे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मिलिंद झोडगे, प्रशिक्षक आणि राष्ट्रीय खेळाडू संदीप गायखे, मास्टर्स राष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेते गणेश गोंडे उपस्थित होते.

भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचे सुभेदार असणा-या नीरज चोप्राने 87.58 मीटर लांब भाला टाकून सुवर्ण पदक पटकाविले. निरजच्या या यशासाठी त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.