Talegaon Dabhade News : लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या 80 आस्थापनावर पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर शासनाने बुधवार (दि.14) पासून लॉकडाऊन जाहीर केल्यापासून तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या हद्दीत 80 आस्थापना, 150 विना मास्कवर कारवाई केली असून तळेगाव दाभाडे हद्दीत जागोजागी नाकेबंदी करुन चेकपोस्ट सुरु आहे. नागरिकांचे समुपदेशन केले जात आहे.

_MPC_DIR_MPU_II

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार शासनाने लॉक डाऊन सुरु केल्यापासून पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे व सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 7 अधिकारी, 28 पोलीस कर्मचारी, 8 होमगार्ड व 20 विशेष पोलीस अधिकारी नियुक्त केले आहे.  सोमाटणे टोल नाका, लिंब फाटा, जिजामाता चौक, स्टेशन चौक, शिवाजी चौक आदी ठिकाणी नाकाबंदी केली असून चेकपोस्ट सुरू आहे.

शासनाचे नियम डावलून विनाकारण दुकान, हॉटेल, मेस सुरु ठेवणाऱ्या एकूण 80 जणांवर दंडात्मक कारवाई करून प्रत्येकी 1000 रुपये दंड वसूल केला. विनाकारण विना मास्क फिरणाऱ्या 150 जणांवर दंडात्मक कारवाई करुन प्रत्येकी 500 रुपये दंड वसूल केला.

पोलीस अधिकारी शहाजी पवार, दुर्गानाथ साळी, दिगंबर अतिग्रे, ज्ञानेश्वर झोल, दत्ताजी मोहिते, महेश मतकर, कर्मचारी प्रशांत वाबळे, बाबराजे मुंडे आदी नियुक्त केले आहेत.

नागरिकांना विना कारण फिरण्यास मज्जाव केला असून मास्क व सॅनिटायझर वापर तसेच गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका असे आवाहन केले जात आहे.

(दि. 1/05/21) पर्यंत कारवाई सुरू राहणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.