Pune News : शहरातील सर्वात मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 63 जण ताब्यात

एमपीसी न्यूज : मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई होत असताना मात्र पोलीस आयुक्तालयात पासून काही अंतरावर असणाऱ्या एका इमारतीत मात्र राजरोसपणे सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी जुगार खेळणाऱ्या 63 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका इमारतीत जुगार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यांनी या माहितीची खातरजमा केली असता येथील इमारतीत खुलेआम जुगार सुरू असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुन्हे शाखेचा दोन पथकांनी जुगार सुरू असणाऱ्या इमारती वर छापा टाकून ही कारवाई केली. या कारवाई दरम्यान पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या 63 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून दोन लाखांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत अहि अशाच प्रकारे एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला होता. त्यानंतर लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाही अशा प्रकारची कारवाई झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.