Pimpri News : काशिनाथ नखाते यांच्यावरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार शोधा

पुरोगामी संघटनांसह कष्टकऱ्यांचे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन

एमपीसी न्यूज – कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या कार्यालयावर नुकताच काही गुंडाकडून हल्ला झाला होता. यातील मुख्य सूत्रधार शोधा तसेच गुंडावर गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करावी आणि नखाते यांना पोलीस संरक्षण द्या या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील पुरोगामी संघटना तसेच कष्टकरी कामगार यांनी आज (सोमवारी) पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन केले.

स्वराज अभियानचे प्रदेशाध्यक्ष मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, छावा संघटनेचे धनाजी केळकर पाटील, बाराबलुतेदार महासंघाचे प्रताप गुरव ,आम आदमी पक्षाचे चेतन बेंद्रे, जनवादी महिला संघटनेच्या अपर्णा दराडे, सामाजिक कार्यकर्ते रामदास केंदळे, स्वप्नील जवळे, क्रांतीकुमार कडुलकर, इरफान चौधरी, राजू बिराजदार, अनिल बारवकर ,मधुकर वाघ, बालाजी लोखंडे, समाधान जावळे ,राजू खंडागळे ,अंबादास जावळे , राजाभाऊ हाके, अशोक नरोटे, सय्यद अली, सुरेश देडे, चतुर्भूज गायकवाड, वृषाली पाटणे, नंदा तेलगोटे ,सरिता वाठोरे आंदोलनात सहभागी झाले होते.

पिंपरी-चिंचवड शहरातील 20 पुरोगामी संघटनांनी आंदोलनास पाठिंबा दिला कष्टकरी संघर्ष महासंघ ,महाराष्ट्र फेरीवाला क्रांति महासंघ, नॅशनल हॉकर फेडरेशन, पदाधिकारी घरेलू कामगार, बांधकाम कामगार, फेरीवाला, रिक्षाचालक यांचेसह कामगारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.

मानव कांबळे म्हणाले की, ”हल्यामागील सूत्रधार कोण आहे हे तपासले पाहिजे. निगडी पोलीस स्टेशन चे अधिकारी गुन्हा दाखल करून घेत नाहीत. याच्यामागे सूत्रधार कोण आहे. कोणाची आर्थिक देवाण-घेवाण आहे. याचा तपास पोलिसांनी करणे गरजेचे आहे. अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल”.

मारुती भापकर म्हणाले की, पोलीस व महापालिकेच्या चुकीच्या गोष्टींमुळे गुन्हेगार व बेकायदेशीर हॉकर्सकडून हप्ता गोळा करणारी मंडळी निर्माण झाली आहेत. त्यांना वेळीच ठेचले पाहिजे.

आंदोलनानंतर शिष्टमंडळाने अप्पर कामगार आयुक्त संजय शिंदे यांची भेट घेतली. गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी. हल्ल्याचा मुख्य सूत्रधार शोधावा. नखाते यांना पोलीस संरक्षण द्यावे. गुन्हेगारांना मदत करणा-या पोलिसांवर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन अप्पर पोलीस आयुक्त शिंदे यांना देण्यात आले. त्यावर त्यांनी योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.