Pune : मुठा कालवा घटनेतील बाधितांना राज्य शासनाकडून 3 कोटींची मदत- गिरीश बापट (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- पुण्यात मुठा उजवा कालवा फुटून दांडेकर पूल झोपडपट्टीतील घरात पाणी शिरून अनेक रहिवाशांचे आर्थिक नुकसान झाले. त्यासाठी राज्य शासनाकडून बाधितांना तीन कोटीची मदत दिली जाणार असल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.

त्याचबरोबर या लोकांना एक महिन्याचे रेशन दिले जाणार असून त्यासोबत ज्या घरातून पाण्याच्या प्रवाहासोबत गॅस सिलेंडर वाहून गेले आहेत अशा नागरिकांना गॅस सिलेंडर देण्याचे आश्वासन बापट यांनी दिले. घटनास्थळाचे पंचनामे झाले असून त्यानुसार त्यांना मदत केली जाणार आहे. महापालिकेकडून प्रत्येक कुटुंबाला अकरा हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.