Pune : महिलांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पत्रकार मुकेश माचकर यांच्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : सध्या मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या (Pune) अत्याचारामुळे देशात तणावाचे वातावरण आहे. अशातच सोशल मिडियावर तसेच महिलांविरुद्ध हिंसा भडकवल्याप्रकरणी मार्मिकचे कार्यकारी संपादक मुकेश माचकर यांच्याविरुद्ध पुण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

पुण्यातील एरंडवणा भागातील अलंकार पोलिस स्टेशनमध्ये लेखिका अश्विनी कुलकर्णी (वय 35) यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. अलंकार पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

सध्या मणिपूर प्रकरणावरून सोशल मीडियावर असंतोषाचे वातावरण आहे. सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. परंतु, यातच मुकेश माचकर यांनी सोशल मिडियावर स्त्रियांवर आक्षेपार्ह पोस्ट केली.

Shirish Kanekar : ‘फिल्मबाजी’ गाजवाणारे ज्येष्ठ पत्रकार शिरीष कणेकर यांचे निधन

या प्रकरणी त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 500, 502, 153A, 505(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणी अश्विनी कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटले, की मणिपूरमध्ये महिलांबाबत झालेला प्रकार निंदनीय आहे. या घटनेबाबत सर्व नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. आम्हीही या (Pune) प्रकाराचा निषेध करतो.

परंतु, मणिपूरमधील घटनेला प्रतिसाद म्हणून, सोशल मीडियावर मुकेश माचकर यांनी विशिष्ट समुदाय आणि महिलांबद्दल द्वेष व्यक्त करून प्रक्षोभक विधाने केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.