Pune Accident : पुण्यात भरधाव कंटेनरची रिक्षा आणि दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू तिघे जखमी

एमपीसी न्यूज : पुण्यातील (Pune Accident) हडपसर परिसरात आज सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने दुचाकी आणि रिक्षाला जबर धडक दिल्याने या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

याप्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात सिमेंट मिक्सर चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा सिमेंट मिक्सर जागीच पलटी झाला. या सिमेंट मिक्सर खाली रिक्षा सापडल्याने रिक्षाचा चुराडा झाला. यामध्ये रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर रिक्षातील तिघेजण जखमी झाले आहेत.

दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी जमा (Pune Accident) झालेल्या नागरिकांनी तातडीने जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमी झालेल्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातानंतर पुणे सोलापूर महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. पोलीस वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Rajgad News : चोरीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीला केले अटक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.