Pune : कंपनीतून कर्मचाऱ्यानेच चोरले सव्वा दोन लाखांचे लॅपटॉप

एमपीसी न्यूज – कंपनीतील अधिकाऱ्याने (Pune) सुरक्षा रक्षकासोबत मिळून कंपनीतील सव्वा दोन लाखांचे पाच लॅपटॉप चोरले. ही घटना 14 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत प्रीमियम ट्रान्समिशन प्रा. लिमिटेड कंपनीत घडली.

जयंत मनोहर हर्षे (वय 56, रा. सिंहगड रोड, पुणे) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. 2) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंपनीतील वरिष्ठ अधिकारी इंद्रजित वाझे, सुरक्षा रक्षक (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri Fire : पिंपरी येथे दुकानाला पहाटे लागली आग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काम करत असलेल्या प्रीमियम ट्रान्समिशन प्रा. लिमिटेड कंपनीतून आरोपींनी दोन लाख 37 हजार 480 रुपये किंमतीच्या पाच लॅपटॉपचा अपहार केला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.