Pune News : पुणे झाले राज्यातील सर्वात मोठे शहर, मुंबईला टाकले मागे 

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या हद्दीमध्ये अखेर 23 गावांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडुन घेण्यात आला आहे. यामुळे आता महापालिकेची हद्दवाढ झाली असून 518.16 स्व्केअर किलोमिटर इतके क्षेत्र झाले आहे. मुंबईचे क्षेत्रफळ 438 स्व्केअर किलोमिटर असून राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुणे ही सर्वात मोठी महापालिका झाली आहे.

महापालिकेच्या हद्दीमध्ये 34 गावांचा समावेश करण्याचा निर्णय :

महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असताना 34 गावांचा समावेश समावेश महापालिकेच्या हद्दीत करण्यात यावा असा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर गावे घेण्यास उशिर झाल्यामुळे गावकर्‍यांना न्यायालयात जावे लागले होते. त्यामुळे 2017 साली महापालिकेच्या हद्दीत 11 गावांचा समावेश करण्यात आला. 2020 पर्यंत 34 गावे महापालिकेच्या हद्दीमध्ये घ्यावीत असे शपथपत्र राज्य सरकारकडुन उच्च न्यायालयात देण्यात आले होते.

महापालिकेच्या हद्दीमध्ये 23 गावांचा समावेश झाल्यामुळे याठिकाणी महापालिकेला पायाभूत सुविधा द्याव्या लागणार आहेत. यासाठी आता पाणी, ड्रेनेज, स्वच्छता, शिक्षण यांसारख्या सुविधा महापालिकेला सुरुवातीला या भागात उभ्या कराव्या लागणार आहेत. 23 गावांचा समावेश झाल्यामुळे महापालिकेच्या यंत्रणेवर तान येण्याची शक्यता आहे. यागावंची सध्या 4 लाख लोकसंख्या आहे. या गावांचे क्षेत्र सध्या पीएमपआरडीएच्या हद्दीत असून गावांचा विकास आराखडा सुध्दा तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे गावांचा स्वतंत्र विकास आराखडा करण्यात येणार की, पीएमआरडीएचा विकास आराखडा लागू होणार हे अद्याप निश्चित नाही

या गावांचा समावेश : 

म्हाळुंगे, सूस,बावधन बुद्रक,किरकिटवाडी,पिसोळी, कोंढवे धावडे,कोपरे,नांदेड,खडकवासला,मांजरी बुद्रुक, नर्‍हे,होळकरवाडी,औताडे-हांडेवाडी,वडाचीवाडी,शेवाळवाडी, नांदोशी,सणसनगर, मांगडेवाडी भिलारेवाडी,गुजरनिंबाळकरवाडी,जांभुळवाडी,कोळेवाडी,वाघोली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.