Pune : दारुंब्रे येथे एक लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – दारुंब्रे येथे बंद घराचे (Pune) कुलुप तोडून चोरट्यांनी घरातून 1 लाख 15 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ही चोरी 11 डिसेंबर ते 16 डिसेंबर या पाच दिवसाच्या कालावधीत घडली आहे.

या प्रकरणी बाळा दगडू आगळे (वय 65 रा. दारुब्रे) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर कुलुप लावून बंद असताना चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून घरातील कापाटातून 80 हजार रुपये रोख रुपये व 35 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण 1 लाख 15 हजार रुपयांची चोरी केली आहे. यावरून शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात (Pune) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.