Pune Crime News : बिल्डरच्या घरातून 23 लाखांचे हिरे चोरीला; घरकाम करणारी महिला अटकेत

एमपीसी न्यूज – मगरपट्टा सिटी भागात राहणार्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरातून 23 लाखांचे हिरेजडीत दागिने लांबविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.या प्रकरणी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकाच्या घरात काम करणार्या महिलेला अटक करण्यात आली आहे.

 

राधा अशोक झा (वय 37, रा.वैदुवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.याबाबत बांधकाम व्यावसायिकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राधा झा ही बांधकाम व्यावसायिकाच्या सदनिकेत काम करत होती. तिने लक्ष नसल्याची संधी साधून कपाटातील 23 लाख 50 हजारांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने लांबविले असावेत कारण त्यानंतर राधा कामावर आली नाही, असे फिर्यादीचे म्हणणे आहे.

 

दरम्यान दागिने चोरीला गेल्याचे उघडकीस आल्यानंतर तक्रार देण्यात आली. राधाने दागिने चोरल्याचा संशय बांधकाम व्यावसायिकाने फिर्यादीत व्यक्त केला.त्यानंतर पोलिसांनी तपास करुन तिला अटक केली. न्यायालयाने राधाला चार दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.