Talera Hospital : तालेरा हॉस्पिटलमध्ये भीषण आग

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील तालेरा हॉस्पिटलमध्ये (Talera Hospital) शनिवारी (दि. 21 मे) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास आग लागली. अग्नीशमन विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग नियंत्रणात असल्याचे अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील तालेरा रुग्णालयात आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. हॉस्पिटलच्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये ही आग लागली आहे.  हि आग इन्व्हर्टरच्या बॅटरीमध्ये लागली असून, इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता.

Wakad Prostitution Case : वेश्या व्यवसाय प्रकरणी गुन्हे शाखेचा छापा; दोन महिलांची सुटका

आग लागल्याने धुराचे लोट संपूर्ण हॉस्पिटलच्या (Talera Hospital) इमारतीत पसरले. वेळीच सर्वांनी बाहेर, सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. त्यामुळे सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन विभाग मुख्य केंद्राचे दोन, थेरगाव, प्राधिकरण, रहाटणी उपकेंद्राचे प्रत्येकी एक असे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी काही वेळेतच आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.