Talegaon suicide Case : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने (Talegaon suicide Case) गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. 20 मे) तळेगाव दाभाडे येथे घडली. त्यानुसार सासरच्या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शोभना सुशील देवरे (वय 31) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी अशोक सोनबा भालेराव (वय 61, रा. वल्लभनगर, पिंपरी) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुशील सुरेश देवरे (वय 35, रा. दुबई), सुरेश चिंधा देवरे, कुसुमबाई सुरेश देवरे (दोघे रा. तळेगाव दाभाडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Selling Tobacco Products : तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी (Talegaon suicide Case) यांची मुलगी शोभना यांना वारंवार मानसिक त्रास देऊन शाब्दिक भांडणे करून मारहाण केली. ‘तू माझ्या मुलाच्या आयुष्यात साडेसाती आली आहे. तुझ्यापेक्षा चांगल्या मुली माझ्या मुलाला भेटल्या असत्या. तू मेली तरी मी माझ्या मुलाचे दुसरे लग्न करून देईल’ असे बोलून फिर्यादी यांची मुलगी शोभना यांना त्रास दिला. या त्रासाला कंटाळून शोभना यांनी शुक्रवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.