Pune Crime : धक्कादायक! मोबाईलमुळे 18 वर्षीय तरुणाने स्वत:च्याच आईचा केला खून

एमपीसी न्यूज : आपल्या मुलांना चांगले वळण लावणे हे पालकांनाच महागात (Pune Crime) पडत आहे. पुण्यात आपल्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ अभ्यास करताना सारखा मोबाईल पाहतो म्हणून आई रागवल्याने अठरा वर्षीय तरुणाने स्वतःच्याच आईला भिंतीवर ढकलून गळा दाबून खून केला. 

पुण्यातील लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील उरळी कांचन भागात ही घटना घडली. तस्लिम शेख (वय 37) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून तिचा मुलगा जिशन शेख (वय 18) यानेच तीची हत्या केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तस्लिम शेख या त्यांच्या पती आणि मुलासह उरळी कांचन भागात राहायला होत्या. सुरुवातीला तस्लिम यांनी आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, शवविच्छेदन झाल्यानंतर ही आत्महत्या नसून खून आहे हे निष्पन्न झाले.

Shiv Jayanti : शिवजयंतीनिमित्त शिवनेरीकडे जाणाऱ्या मार्गावर सरकारकडून टोलमाफी

पोलिसांनी घरातील व्यक्तींची चौकशी केली असता जिशनने सगळा प्रकार सांगितला. काही दिवसांपूर्वी (Pune Crime) जिशन हा अभ्यास करत असताना त्याच्या आईने त्याला सतत मोबाईल पाहतो, म्हणून रागवून मारले होते. यावेळी राग अनावर झाल्याने जिशनने त्याच्या आईला भिंतीवर ढकलले आणि तिचा गळा दाबून खून केला.

घाबरलेल्या जिशनने त्याच्यावर संशय येऊ नये म्हणून आईच्या हाताची नस कापली, मात्र रक्त न आल्याने त्याने मृतदेहाला पंख्याला लटकवले आणि तिने आत्महत्या केली असा बनाव केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.