Maval poultry farm: जिल्हा बँकेच्या सहकार्याने मावळ मध्ये निर्माण होणार 100 स्वतंत्र पोल्ट्री व्यावसायिक

संचालक माऊली दाभाडे यांची ग्वाही

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी मध्यवर्ती मावळ तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांना (Independent Poultry Commercial) कंपन्यांसोबत करार पद्धतीने व्यवसाय करण्याऐवजी स्वतंत्र पोल्ट्री व्यवसाय करण्यासाठी उद्युक्त केले जात आहे. बँकेकडून 100 पोल्ट्री व्यावसायिकांना स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे तसेच स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी पोल्ट्री व्यवसायाचे प्रशिक्षणही दिले जाणार असल्याची ग्वाही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांनी दिली.

शेतीबरोबरच शेतकऱ्यांनी शेतीपुरक व्यवसाय करावेत म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने शेतीपुरक व्यवसायांना विशेष कर्ज धोरण सुरू केलेले आहे. शेतकऱ्यांनी पोल्ट्री,डेअरी पाॅलीहाऊस,नर्सरी,कृषी पर्यटन आदी व्यवसाय करावेत असे आवाहन संचालक दाभाडे यांनी केले आहे.

बॅंकेने पोल्ट्री व्यवसायासाठी (Independent Poultry Commercial)  नुकतेच सुधारित धोरण जाहीर केले आहे. शेतकऱ्यांना नविन पोल्ट्री सुरू करण्यासाठी कर्ज स्वयंचलित (ऑटोपोल्ट्री) पोल्ट्री उभारण्यासाठी कर्ज तसेच.ओपन पोल्ट्री फार्मसाठी, भांडवलासठी कर्ज, पक्षी घेण्यासाठी कर्ज, खाद्य व औषधे घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे असेही दाभाडे यांनी यावेळी सांगितले.

8 to 80 Park Safari : शालेय विद्यार्थ्यांनी 8 टू 80 पार्क सफरीचा घेतला आनंद

ओपण पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी पक्षी घेण्यासाठी व खाद्य तसेच औषधे यासाठी विशेष मार्गदर्शनही केले जाणार आहे. याशिवाय पक्षी विक्री (मार्केटिंग) करण्यास सहकार्य केले जाणार आहे. फार्मरनी पोल्ट्री कंपन्यांशी करार पद्धतीने पोल्ट्री व्यवसाय करण्यापेक्षा स्वतःचा स्वतंत्र पोल्ट्री व्यवसाय करावा असे आवाहनही दाभाडे यांनी केले.

येत्या दि 1 ऑगस्टपासून कर्ज प्रकरणे स्विकारली जाणार आहेत. मावळ तालुका पोल्ट्री संघटनेने यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन दाभाडे यांनी केले आहे. बॅंक पहिल्यां टप्प्यात 100 पोल्ट्री फार्मरची प्रकरणे करणार आहे. ज्या पोल्ट्री फार्मरला कर्ज प्रकरण करायचे आहे त्यांनी P.D.C.C.बॅंक शाखा अथवा आपली विकास सोसायटीचे सचिव तसेच मावळ तालुका पोल्ट्री संघटनेचे संघटक सोनबा गोपाळेगुरूजी यांचेशी संपर्क करावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.