Pune : ‘कसब्याची ताकद गिरीश बापट, कसब्याची ओळख मुक्ता टिळक’; घोषणांनी दुमदुमला महापालिका परिसर

एमपीसी न्यूज – सभागृह नेतेपद धीरज घाटे यांना तर, स्थायी समितीचे अध्यक्षपदासाठी हेमंत रासने यांना ही दोन्ही पदे कसबा मतदारसंघात देण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ‘कसब्याची ताकद गिरीश बापट आणि कसब्याची ओळख मुक्ता टिळक’ आशा घोषणांनी सोमवारी महापालिका परिसर दुमदुमला. याला निमित्त होते हेमंत रासने यांच्या आज अर्ज दाखल करण्याचे.

यावेळी खासदार संजय काकडे गट मात्र अनुपस्थित असल्याचे चित्र पहावयास मिळाले. शुक्रवारी (दि. 13 डिसेंबर) स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यादिवशी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन हेमंत रासने यांनी केले. पुणे शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. तर, एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने सभागृह नेतेपदाचा मान दिला.

आगामी काळात पुणेकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे धीरज घाटे म्हणाले. यावेळी नगरसेवक राजेश एनपुरे, उमेश गायकवाड आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.