Pune: महापालिकेच्या रुग्णालयात चांगली सेवा; कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाची भावना

Pune: Good service in Municipal Hospital; Feelings of a corona-free patient पुणे महापालिकेच्या रुग्णालयात कोणत्याही प्रकारचा खर्च न घेता रुग्णसेवा केली जाते. ही खूप अभिनंदनास्पद बाब आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनाचे संकट पुण्यात गंभीर झाले असताना खासगी रुग्णालयांमध्ये अक्षरशः लूट सुरू आहे. मात्र, पुणे महापालिकेच्या रुग्णालयात चांगली सेवा देण्यात येत आहे, अशी भावना कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णाने व्यक्त केली.

कोंढवा-येवलेवाडी, सिंहगड सीसीसी कॅम्पसमधील पुणे महापालिकेचे डॉ. बच्छाव, लाटणे आणि स्वच्छता कर्मचारी यांची टीम येणाऱ्या प्रत्येक रुग्णांबाबत उत्कृष्ट पध्दतीने नियोजन करून काळजी घेत आहेत.

येथील आहार देखील चांगल्या पद्धतीने सर्व रुग्णांना दिला जातो. प्रत्येक रुग्णाची योग्य प्रकारे काळजी घेतली जाते. खासगी रुग्णालये सध्या भरमसाठ बिल आकारत आहेत. तरीही रुग्ण बरे होत नाहीत.

मात्र, पुणे महापालिकेच्या रुग्णालयात कोणत्याही प्रकारचा खर्च न घेता रुग्णसेवा केली जाते. ही खूप अभिनंदनास्पद बाब आहे. त्याबद्दल महापालिकेच्या सर्व डॉक्टर्स, स्टाफ आणि स्वच्छता कर्मचारी यांचे कौतुक करून धन्यवाद मानले.

पुणे शहरात सध्या 30 हजार 523 रुग्ण झाले आहेत. त्यामध्ये वेळीच उपचार घेतल्याने 19 हजार 570 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोना झाला म्हणून काहीही घाबरण्याचे कारण नाही. केवळ काळजी घेण्याची गरज आहे.

मास्क, सॅनिटायजरचा वापर, फिजिकल डिस्टनसिंग पाळण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. कोरोना सुद्धा बरा होऊ शकतो, हे या नागरिकांनी दाखवून दिले आहे. कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी पुणे महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी, रात्रंदिवस काम करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.