Pune : महावितरणच्या ‘सौर’ प्रदर्शनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

एमपीसी न्यूज – सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प (Pune), मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-2, विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन आदी योजनांबाबत माहिती देणाऱ्या महावितरणच्या प्रदर्शनाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोशिएशनच्या (मास्मा) वतीने पुणे येथे महालक्ष्मी लॉन्समध्ये 8 व 9 जुलै रोजी सोलर एक्स्पो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी केंद्रीय अपांरपरिक ऊर्जा विभागाचे सहसचिव दिनेश जगदाळे, महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे, मुख्य अभियंता राजेंद्र पवार, महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक पंकज तगलपल्लेवार, ‘मास्मा’चे अध्यक्ष रोहन उपासनी यांनी या प्रदर्शनाला भेट दिली.

PCMC : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वानिमित्त परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

यावेळी सहसचिव जगदाळे यांनी महावितरणकडून सौर ऊर्जा योजनांची सुरु असलेल्या प्रभावी अंमलबजावणीचे व जनजागृतीपर उपक्रमांचे कौतुक केले. यामध्ये स्वतंत्र स्टॉलद्वारे महावितरणकडून छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी-2.0, विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्स आदी योजनांची माहिती देण्यात आली.

या प्रदर्शनामध्ये सौर पॅनेलद्वारे (Pune) ऊर्जा निर्मिती ते मिटरिंग पर्यंतचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले व माहितीपत्रके वितरीत करण्यात आले. दोन दिवसांमध्ये सुमारे 3 हजार 500 नागरिकांनी या स्टॉलला भेट दिली.

महावितरणच्या वतीने अतिरिक्त कार्यकारी अभियंता राकेश महाजन, उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पटनी व सहकाऱ्यांनी विविध योजनांची माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.