Pune : आरोग्‍य मंत्री टोपे यांनी पुण्यातील नायडू रुग्‍णालयातील डॉक्‍टर, परिचारिकांचे मानले आभार

एमपीसी न्यूज – सार्वजनिक आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण मंत्री राजेश टोपे यांनी पुणे महापालिकेच्‍या डॉ. नायडू रुग्‍णालयाला भेट देऊन पहाणी केली. तसेच सुरु असलेल्या वैद्यकीय सेवेबाबत डॉक्‍टर, परिचारिकांचे आभार मानले.

यावेळी जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सुनील टिंगरे, पुणे महापालिकेच्‍या अतिरिक्‍त आयुक्‍त रुबल अग्रवाल, आरोग्‍य प्रमुख रामचंद्र हंकारे, वैद्यकीय अधीक्षक सुधीर पाठसुते यांच्‍यासह इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. टोपे यांनी रुग्णांची सद्यस्थिती जाणून घेतली.

त्‍यांना आवश्‍यक त्‍या सोयी सुविधा देण्‍याबाबत सूचना केल्‍या. रुग्‍णालयातील डॉक्‍टर आणि परिचारिका उत्‍तम सेवा देत असल्‍याबद्दल टोपे यांनी त्‍यांना धन्‍यवाद दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.