Pune News: महापालिकेच्या ताफ्यात भाडे तत्त्वावर 8 इलेक्ट्रीक गाड्या दाखल

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या वाहन विभागाच्या ताफ्यात नवीन 8 इलेक्ट्रीक गाड्या दाखल झाल्या आहेत. या गाड्या वर्ग एकमधील अधिकार्‍यांसाठी भाडे तत्त्वावर घेण्यात आल्या असून एका गाडीसाठी दिवसाला साधारण दोन हजार रुपये भाडे दिले जाणार आहे. आवश्यकतेनुसार गाड्यांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे वाहन विभागाच्या अधिकार्‍याने सांगितले आहे.

महापालिकेकडे अधिकारी आणि पदाधिकार्‍यांसाठी ऍम्बेसिडर, इंडिका, इंडिगो, मांझा, टोयाटो अल्टीस, सियाझ, टाटा टियागो, कोरोला, ईटीओस आणि स्विफ्ट डिझायर या पेट्रोल व डिझेलवर धावणार्‍या 107 गाड्या आहेत. तर भाडेतत्वावरील जीप, इको व्हॅन आणि इंडिका या कंपनीच्या 80 गाड्या आहेत.

डिझेल व पेट्रोलच्या वाढत्या किंमती लक्षात घेवून महापालिकेच्या वर्ग एकमधील जे अधिकारी टाटा इंडिका गाड्या वापरतात, त्या अधिकार्‍यांसाठी भाडे तत्वावर इलेक्ट्रिक गाड्या घेण्याचा प्रस्ताव शेवटच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुर करण्यात आला होता.

त्यानुसार निवीदा मंजुर झालेल्या ठेकेदाराने सोमवारी 8 इलेक्ट्रिक गाड्या प्रशासनाला सुपूर्द केल्या. एका गाडीसाठी दिवसाला 2 हजार रुपये भाडे आकारले जाणार आहे. गाड्यांसाठी पार्कींग आणि चॉजिर्ंंग स्टेशनची व्यवस्था संबंधीत ठेकेदारच करणार आहे. गरजेनुसार आणखी गाड्या वाहन विभागाच्या ताफ्यात दाखल केल्या जाणार अल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

दरम्यान, नवीन इलेक्ट्रिक गाड्यांची महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरीक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, ज्ञानेश्वर मोळक, यांच्यासह इतर अधिकार्‍यांनी पाहणी करून माहिती घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.