Pune News: खडकवासला धरणातून 9 हजार 416 क्युसेक वेगाने विसर्ग कायम!

एमपीसी न्यूज – खडकवासला साखळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची हजेरी कायम असून पानशेत धरणातून 3,908 तर वरसगाव धरणातून 2,600 क्युसेक वेगाने पाणी खडकवासला धरणात सोडले जात असून खडकवासला धरणातून 9,416 क्युसेक वेगाने मुठा पात्रात विसर्ग सुरु आहे.
पुणे शहराला वर्षभर पुरेल एवढ्या पाण्याचा साठा धरणांमध्ये झाल्यामुळे पुणेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता यापूर्वीच मिटली आहे. त्यातच या चार धरणाव्यतिरिक्त भामा-आसखेड धरणात देखील पुण्यासाठी पाणी आरक्षण ठेवण्यास राज्य शासनाने मंजुरी दिल्यामुळे पुणे शहराची पाण्याची अतिरिक्त गरज देखील भागविणे शक्य होणार आहे.