Pune News: गणेश विसर्जनासाठी महापौरांच्या योजना फसव्या, जनतेच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार- मनसे

Pune News: Mayor's plans for Ganesh immersion are fraudulent- MNS घरात विसर्जन केलेल्या गणेशमुर्तीच्या विरघळलेल्या पाण्याचे काय करायचे ते नागरिकांना सांगावे.

एमपीसी न्यूज – गणेश विसर्जनासाठी महापौरांच्या योजना फसव्या असल्याचा आरोप मनसेतर्फे करण्यात आला आहे. गणेश विसर्जनासंदभार्तील महापौरांनी जाहीर केलेले अनेक योजना फुसक्या आहेत. त्यामुळे पुणे शहरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. बहुसंख्य जनतेच्या धार्मिक भावना देखील दुखावल्या जाणार असल्याचे मनसेचे शहराध्यक्ष अध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगितले.

महापौर मोहोळ यांना मनसेने निवेदन दिले आहे. गणेशाच्या मूर्ती संदर्भात उंचीचे बंधन घालण्यात आले आहे. पण, शहरात बसवण्यात येणाऱ्या ताबुतांच्याबाबत चकार शब्द उच्चारण्यात आला नाही. या ताबुतांचे विसर्जन कसे करणार याबाबत काय नियोजन केले आहे का? हिंदू धर्मियांच्या धार्मिक कार्यात आपण बिनदिक्कत हस्तक्षेप करताना इतर ठिकाणी काही निर्णय घेतले आहेत काय तेही जाहीर करावे असे सांगितले आहे.

शहरातील घरगुती गणपतीचं विसर्जन घरात करा म्हणून सांगितले गेले आहे. एक दीड फुटाची गणपतीची मूर्ती नक्की कोणत्या बादलीत विसर्जन करावी लागेल याचा अभ्यास केलेला नाही. मूर्तींचा आग्रह धरताना शहरात त्या किती उपलब्ध आहेत, याचा साधा अभ्यासही महापौरांनी केला नसून, घरात विसर्जन केलेल्या गणेशमुर्तीच्या विरघळलेल्या पाण्याचे काय करायचे ते नागरिकांना सांगावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.