Pune News : सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत महिला संरक्षण उपाययोजनांबाबत आढावा

एमपीसी न्यूज – महिलांच्या संरक्षणासाठी हुंडा निर्मुलन, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण, देवदासी प्रथा निर्मुलन, अनैतिक व्यापार (प्रतिबंध) यासारख्या सामाजिक कायद्याची अणि महिला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीची बैठक उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

बैठकीस जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अश्विनी कांबळे, जिल्हा सरकारी वकील अॅड. एन. डी. पाटील, तालुकास्तरीय संरक्षण अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.

यावेळी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 अंतर्गत संरक्षण अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यासेाबतच हुंडा प्रतिबंधक कायदा, महिला व आर्थिक विकास महामंडळातर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजना, महिला समुपदेशन केंद्र आदींचा आढावा घेण्यात आला. पिडित महिलांना तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी सर्व संबंधितांनी संवेदनशिलतेने आणि तत्परतेने कार्यवाही करावी, असे तेली यांनी यावेळी सांगितले.

पुणे जिल्ह्यात दोन शासकीय महिला आधारगृह असून त्यांना संरक्षणगृह म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 अंतर्गत 13 तालुक्यांसाठी 13 संरक्षण अधिकारी आणि पुणे शहरासाठी एक जिल्हा संरक्षण अधिकारी कार्यरत आहे. उज्ज्वला योजना आणि स्वाधार योजनेअंतर्गत प्रत्येकी एक संस्था कार्यरत आहे. तसेच पोलीस ठाण्याच्या आवारात 4 समुपदेशन केंद्र कार्यरत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.