Pune News : चोरीच्या केटीएम बाईक सह चोरट्याला अटक, सात दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज – चोरीच्या केटीएम बाईक सह मुंबई-पुणे महामार्गावर थांबलेल्या चोरट्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून तीन लाख किंमतीच्या एकूण सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी (दि.03) गुन्हे शाखेच्या युनिट -3 ने ही कारवाई केली.

अक्षय मारूती कापडी (वय 22, रा. पारगाव शिंगवे, आंबेगाव, पुणे) असे या अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कर्वेनगर येथून चोरी केलेली केटीएम बाईक घेऊन मुंबई-पुणे महामार्गावर, डुक्कर खिंड येथे थांबला होता. युनिट -3 च्या पोलिसांना याबाबत माहिती मिळताच याठिकाणी सापळा रचून त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्यावर चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आणले असून, तीन लाख किंमतीच्या एकूण सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.