Pune : समर्पण दिवसानिमित्त पुण्यामध्ये 15 ठिकाणी विशाल सत्संग समारोहाचे आयोजन

एमपीसी न्यूज – समर्पण दिवसानिमित्त संत निरंकारी भवन भोसरी समवेत (Pune) पुण्यामध्ये 15 ठिकाणी विशाल सत्संग समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या विविध परिसरातील भाविक भक्तगणांनी मोठ्या संख्येने भाग घेऊन बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या प्रति आपली श्रद्धा सुमने अर्पण केली. सदगुरु माताजींनी एक उदाहरण देऊन समजावले, की दूध घुसळून त्यातून मलई किंवा नवनीत बाहेर पडू शकेल पण पाण्यात रवी घुसळून काहीही मिळणार नाही. तात्पर्य, ईश्वराशी नाते जोडल्यानेच खरी भक्ती होऊ शकेल आणि आपले मन आदर प्रेमाच्या भावनेने ओतप्रोत होईल व गुरूच्या प्रति खरीखुरी प्रेमभक्ती हृदयात उत्पन्न होईल. म्हणूनच सद्गुरूंचा सत्य संदेश केवळ बोलण्यापर्यंत सीमित राहू नये. 

सदगुरु माताजी यांच्या प्रवचना पूर्वी निरंकारी राजपिताजी यांनी आपल्या संबोधनात सांगितले, की बाबाजींचे अवघे आयुष्य उपकार, वरदान आणि कृपादृष्टीने परिपूर्ण होते. बाबाजींनी अवघ्या जगाला प्रेम व शांतीचा दिव्य संदेश दिला. प्रेमाचा वास्तविक अर्थ आम्हाला बाबाजींच्या शिकवणुकीतूनच उमगला. त्यांनी सदैव प्रेम आणि आपल्या (Pune) मधुर हास्याने सर्वांना आनंदित केले इतकेच नव्हे, तर समस्त मानवमात्राच्या प्रति दया व करुणेचा भाव बाळगत सर्वांचे जीवन सार्थक केले.

Alandi : अपरा एकादशी निमित्त माऊली मंदिरामध्ये हजारो भाविकांची गर्दी

बाबाजींचा हाच दृष्टिकोन होता, की जीवनात जर प्रेमभाव असेल तर झुकणे सहज होईल. त्यांच्या मते आपण उंची अशा प्रकारे गाठावी, की तिचा मायावी दुष्प्रभाव भक्ताच्या जीवनावर होऊ नये. बाबाजींनी योग्यता अयोग्यता यांचा विचार न करता सर्वांभूती केवळ समानता आणि करुणेचा भावच दर्शविला. शेवटी राजपिताजी यांनी हीच प्रार्थना केली, की सर्वांचे जीवन सद्गुरूंच्या आशयानुसार व्यतीत व्हावे.

Chinchwad : महाराष्ट्रात दंगली घडवू देणार नाही – देवेंद्र फडणवीस

समर्पण दिवसाच्या मुख्य कार्यक्रमासह स्थानिक कार्यक्रमातही मिशनच्या अनेक वक्त्यांनी व्याख्यान, गीत, भजन व कविता आदि माध्यमातून बाबाजींच्या प्रेम, करूणा, दया व समर्पण यांसारख्या दिव्य गुणांचे वर्णन आपल्या शुभ भावनानांद्वारे केले. बाबा हरदेवसिंहजी यांची करूणामय अनुपम छबी प्रत्येक निरंकारी भक्ताच्या हृदयात कोरली गेली असून त्यातून प्रेरणा घेऊन आज प्रत्येक भक्त आपले जीवन कृतार्थ करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.