Pune : ऑनलाईन राज्यस्तरीय ‘वुशू’ स्पर्धा उद्यापासून; ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनची माहिती

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या अटकावासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व क्रीडांगणे, क्रीडा स्पर्धा बंद आहेत. परंतु लॉकडाऊनच्या काळातच ‘वुशू’ खेळाडूंना ऑनलाईन स्पर्धेची संधी मिळणार आहे. भारतीय वुशू संघटना आणि महाराष्ट्र राज्य वुशू संघटनेच्या वतीने (मंगळवार) 28 ते 30 एप्रिल दरम्यान राज्यस्तरीय ओपन वुशू ताऊल स्पर्धेचे आयोजन केले आहे, अशी माहिती ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे महासचिव सोपान कटके यांनी दिली.

या स्पर्धेतून राष्ट्रीय वुशू स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. स्पर्धेतील इव्हेन्ट हा खेळाडूने घरातच करायचा आहे. घरातील टेरेस किंव्हा अंगणात कौशल्य सादरीकरण न करता बंद खोलीत कौशल्य सादरीकरण करायचे आहे.

बाहेरील आवाराचा वापर करताना आढळल्यास स्पर्धकाला बाद करण्यात येणार आहे. सहभागी आणि विजेत्या खेळाडूंची प्रमाणपत्र, पदके देखील घरपोच दिली जाणार आहेत. स्पर्धेसाठी प्रवेश निशुल्क आहे.

स्पर्धेमध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू श्रावणी कटके, ओंकार पवार सहभागी होणार आहेत. सिनिअर, ज्युनिअर, सबज्युनिअर गटात स्पर्धा होणार आहे.

प्रथम क्रमांक विजेत्यास सुवर्ण पदक व प्रशस्तीपत्र, व्दितीय क्रमांक विजेत्यास रौप्य पदक व प्रशस्तीपत्रक, तृतीय क्रमांकास कांस्य पदक व प्रशस्तीपत्रक तसेच चतुर्थ क्रमांक विजेत्यास कांस्य पदक व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. संदीप शेलार, निलेश वाळींबे, भूषण मराठे, प्रतिक्षा शिंदे पंच म्हणून काम पाहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.