Pune : ‘पीएमआरडीए’कडून नांदेड गाव परिसरात रस्ते निर्जंतुकीकरणासाठी फवारणी

एमपीसी न्यूज – नांदेड गाव परिसरात ‘कोरोना’ या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पी.एम.आर.डी.ए. अग्निशमन दल नांदेड सिटी यांच्याकडून जवळपास 12 किलोमीटरपर्यंतचे रस्ते निर्जंतुकीकरण (सोडियम हायपोक्लोराइटची फवारणी) करण्यात आले.

अग्निशमन दलाकडून असेही योगदान दिसून आले की, जे सतत लोकांच्या जीवांचे आणि मालमत्तेचे आगीपासून रक्षण करतात. त्या अग्निशमन विभागाकडून आपत्कालीन परिस्थितीत समाजाची सेवा हेच ब्रीद कायम ठेवून काम करण्यात आले.

कोरोना विषाणू संबंधित लढ्यात संकल्पित आणि संयमितरित्या पीएमआरडीएचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन अधिकारी सुजित पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.