Pune News : खंडणी प्रकरणात पुण्यातील पोलिस गजाआड

एमपीसी न्यूज : व्याजाने घेतलेल्या पैशासाठी एकाचे अपहरण करून त्याला पुण्यात डांबून ठेवत पन्नास लाखांची खंडणी किंवा पाच एकर जमीन कागदोपत्री नावावर करून मागणाऱ्या सहा जणांना पुणे पोलिसांनी अटक केली. आरोपी मध्ये पुणे पोलीस दलातीलच एका कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली. 

अनिल लक्ष्मण हगवणे, किरण सोपान भिलारे, विशाल अनिल जगताप, संदीप चंद्रकांत पोखरकर, अभिजीत दत्तात्रय देशमुख आणि पोलीस शिपाई मनोज ज्ञानेश्वर भरगुडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की आरोपींनी शिरूर येथून एका व्यक्तीचे अपहरण केले होते. आणि त्याला पुण्यातील एका घरात डांबून ठेवले होते. शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील एका तरूणाने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली होती. दरम्यान आरोपींना न्यायालयात हजर केले असता सर्वांना एक दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.