Pune : ओझर येथे भरणार द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’

एमपीसी न्यूज – श्री विघ्नहर गणपति मंदिर देवस्थान,(Pune) लेण्याद्री गणपती मंदिर देवस्थान, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान, हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने 2 आणि 3 डिसेंबर रोजी श्री विघ्नहर सभागृह, ओझर, जिल्हा पुणे येथे द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे.

 

या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रातून 550 हून अधिक निमंत्रित मंदिराचे विश्‍वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते, अभ्यासक आदी सहभागी होणार आहेत, अशी माहिती ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Maval : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचाही मावळ लोकसभा मतदारसंघावर दावा

या वेळी पत्रकार परिषदेला ग्रामदैवत (Pune)कसबा गणपतीच्या विश्‍वस्त संगिता ठकार, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे महामंत्री विद्याधर नारगोलकर, पुणे जिल्हा जैन महासंघाचे सचिव रमेश ओसवाल, दत्त मंदिर करमाळा येथील विश्‍वस्त दत्तात्रय देवळे, भीमाशंकर देवस्थानचे विश्‍वस्त मधुकर रामकृष्ण गवांदे, हिंदु जनजजागृती समितीचे पराग गोखले आदी उपस्थित होते.

या वेळी सुनील घनवट पुढे म्हणाले की, महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात केवळ 6 महिन्यांत 262 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आणि दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यात या परिषदेसाठी मंदिर विश्‍वस्तांच्या भेटी सुरू असून 200 हून अधिक विश्‍वस्त पुणे जिल्ह्यातून उपस्थित रहाणार आहेत.

या परिषदेला ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ते आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णुशंकर जैन, ‘झी’ 24 तास या वृत्तवाहिनीचे संपादक नीलेश खरे, यांसह अष्टविनायक मंदिरांचे विश्‍वस्त, महाराष्ट्रातील जोतिर्लिंग देवस्थानांचे विश्‍वस्त, संत पिठांचे प्रतिनिधी, यासह देहूचे संत तुकाराम महाराज मंदिर, पैठणचे नाथ मंदिर, गोंदवले येथील श्रीराम मंदिर, रत्नागिरी येथील गणपतीपुळे मंदिर, श्री एकवीरा देवी मंदिर, अंमळनेर येथील मंगळग्रह मंदिर आदी मंदिरांचे विश्‍वस्त, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे आदी सहभागी होणार आहेत. या मंदिर परिषदेत मान्यवरांचे मार्गदर्शन, मंदिरांशी निगडीत विविध विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत.

यामध्ये ‘मंदिरे सनातन धर्मप्रचाराची केंद्रे बनवणे’, ‘मंदिरे सरकारीकरण मुक्त करणे’, ‘वक्फ कायद्या’द्वारे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण आणि मंदिरे बळकावणे यांवर उपाय, मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्या परिसरात मद्य-मांस बंदी; दुर्लक्षित मंदिरांचा जीर्णोद्धार आदी विषयांवर चर्चा होणार आहे. सहभागी होण्यासाठी 7020383264 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंदिर महासंघाने केले आहे.

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.