Pune : ‘कोरोना’मुळे पुण्यात 24 तासांत आणखी तिघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुण्यात ‘कोरोना’ने हाहाकार माजवला आहे. बुधवारी 10 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असताना गुरुवारीही 24 तासांत 3 रुग्णांचा या रोगामुळे मृत्यू झाला. कोरोनाचे पुण्यात रुग्ण वाढत असताना मृत्यू होणाऱ्यांची संख्या काही थांबत नाही. प्रशासन युद्धपातळीवर काम करीत आहे.

आरोग्य खाते जीव ओतून काम करीत आहे. पण, कोरोना काही आटोक्यात यायला तयार नाही. आज दोघांचा ससून हॉस्पिटलमध्ये तर, एकाचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या आता 200 च्या पुढे गेली आहे. या रोगाचे रुग्ण वाढू नये, म्हणून मार्केट यार्ड पासून कोंढवा पर्यंतचा भाग पुणे महापालिकेने सील केला आहे. तर, पोलिसांनी संचारबंदी लागू केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.