Kamshet: कामशेतमधील जुगारअड्ड्यावर पोलिसांचा छापा, सव्वा लाखाची रोकड जप्त

raid on kamshet's gambling den 1.25 lakh cash seized by police

एमपीसी न्यूज: कामशेत येथील जुगारअड्ड्यावर शनिवारी (दि.30) रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत सुमारे 1 लाख 31 हजार 550 रुपयांची रक्कम व मुद्देमाल ताब्यात ताब्यात घेण्यात आला आहे.

अधिक माहिती असी, कामशेत रेल्वे स्थानकाजवळील हॉटेल दत्तभुवनच्या गच्चीवर काही व्यावसायिक तीन पत्ती नावाचा जुगार पत्त्याच्या कॅटवर पैसे लावून जुगार खेळत आहेत अशी खात्रीशीर माहिती पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास मिळाली होती.

या माहितीच्या आधारे शनिवारी (दि.30) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सहाय्यक फौजदार पाटील, पोलीस हवालदार वाघमारे यांच्या पथकाने कामशेत पोलीस ठाण्यातील महिला पोलीस शिंदे, पोलीस नाईक वैभव सकपाळ व बाळकृष्ण भोईर यांच्या सहाय्याने छापा मारला.

त्यावेळी हॉटेल दत्तभुवनच्या गच्चीवरील आतील खोलीत महेश इंद्रमल गादिया, पप्पू बन्सीलाल मुथा, महेंद्र हिरालाल टाटिया, दीपक पोपटलाल जैन, विशाल सुभास शिंदे, राजकुमार उत्तमचंद चोपडा (सर्व रा. कामशेत) हे सहाजण पत्याच्या कॅटवर पैसे लाऊन खेळत असताना आढळून आले.

त्यांच्याकडे 1 लाख 31 हजार 550 रुपयांची रोख रक्कम व जुगाराची साधने मिळून आली. सर्व संशयित आरोपींवर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे या करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.