Raj Thackeray : राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया वैद्यकीय कारणांमुळे पुढे ढकलली… वाचा सविस्तर

एमपीसी न्यूज – मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज (दि.01 जून) हिपबोनची शस्त्रक्रिया करण्यात येणार होती, मात्र वैद्यकिय कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली आहे. ठाकरे यांच्या वैद्यकीय अहवालात कोविड डेड सेल्स असल्याचे आढळून आले आहे त्यामुळे त्यांना अॅनेस्थेशिया देता येणार नाही, त्यामुळे  शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात येणार होती, त्यासाठी ते मंगळवारीच रुग्णालयात दाखल झाले होते. दरम्यान, आज शस्त्रक्रियेपूर्वी त्यांच्या काही वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. त्यावेळी त्यांच्या शरीरात कोविड डेड सेल्स असल्याचे निदान झाले. सेल्स डेड असल्यामुळे ठाकरे यांना कोरोनाची बाधा झालेली नाही मात्र त्यामुळे त्यांनी भूलीचे इंजेक्शन देता येणार नाही असे डाॅक्टरांनी स्पष्ट केले. शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा घरी परतले आहेत.

LPG Gas New Rate Policy : दिलासादायक! व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात; LPG गॅस सिलिंडरचे नवे दर लागू

मनसे नेते ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पायाचे दुखणे वाढले त्यामुळे त्यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील कार्यक्रमादरम्यान राज ठाकरे यांना याबाबत ही माहिती दिली होती. दरम्यान, शस्त्रक्रियेनंतर ठाकरे यांनी दोन महिने सक्तीने विश्रांती घ्यावी लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.