Rajan Lakhe : जिद्द, कष्ट, चिकाटी यांच्या बळावर ध्येयप्राप्ती निश्चित

एमपीसी न्यूज –  जिद्द, कष्ट, चिकाटी यांच्या बळावर ध्येयप्राप्ती निश्चित होते असा कानमंत्र इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे (Rajan Lakhe) यांनी दिला.

ते महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. चिंचवडगाव येथील विरंगुळा केंद्रांवर रविवारी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड आयोजित गुणगौरव समारंभात माजी नगरसेवक सुरेश भोईर, ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवडचे अध्यक्ष रमेश इनामदार, कार्यवाह गोपाळ भसे, कोषाध्यक्ष अरविंद जोशी,नारायण दिवेकर, सतीश कुलकर्णी, सुधाकर कुलकर्णी, हरिभाऊ क्षीरसागर, भिवाजी गावडे, मंगला दळवी, रत्नप्रभा खोत, चंद्रकांत कोष्टी, सुदाम गुरव,गोपाल भसे, दत्तात्रय हरिभाऊ गुपचूप आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार मुरडे यांनी केले. अरविंद जोशी यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.