Rajya sabha Election 2022 : फडणवीसांचा मास्टर प्लॅन; राज्यसभेत भाजपचे तीनही उमेदवार विजयी!

एमपीसी न्यूज (श्याम मालपोटे) – भाजप व महाविकास आघाडीसाठी अतिशय प्रतिष्ठेची बनलेली राज्यसभेची  (Rajya sabha Election 2022) निवडणूक व तब्बल 9 तास रखडलेली मतदान प्रक्रिया आणि आमदारांच्या मतांचा नंबर्स गेम ही सर्व प्रक्रिया पार पडत अखेर भाजपने बाजी मारत आपले तीनही उमेदवार विजयी करत महाविकास आघाडीला दणदणीत धक्काच दिला, असं म्हणता येईल. 

राज्यसभेच्या सहाव्या जागेवर भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला असून धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला आहे. 9 तासांच्या प्रतिक्षेनंतर निकल हाती आला आहे व महाविकास आघाडीचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत.

महाविकास आघाडीला प्रत्यक्ष निकालात मात्र पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. भाजपने महाविकास आघाडीची काही मते फोडण्यात यश मिळवलं आहे. त्यामुळे हा गेम नेमका कसा झाला ते पाहूया.

MLA Laxman Jagtap : आजारी असतानाही आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले राज्यसभा निवडणुकीत मतदान! मतदानानंतर म्हणाले…

राज्यसभा निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मतांची आकडेवारी (Rajya sabha Election 2022) –

महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळालेली पहिल्या पसंतीची मतं –

संजय राऊत- 41

प्रफुल्ल पटेल- 43-2

ईम्रान प्रतापगडी- 44-3

संजय पवार- 33

भाजपच्या उमेदवारांना मिळालेली पहिल्या पसंतीचे मतं –

अनिल बोंडे- 48

पियुष गोयल- 48

धनंजय महाडिक 27

मतांचे समीकरण संजय पवार यांना मिळालेली मतं –

संजय पवार यांना 33 मते मिळाली त्यात प्रफुल्ल पटेल यांना मिळालेली 43 मते त्यातील 41 चा कोटा पूर्ण करत उरलेली 2 तर प्रतापगडी यांना मिळालेली 44 मते त्यातील 41 चा कोटा पाहता 3 मत शिल्लक राहतात. त्यामुळे संजय पवार यांना 38 मते मिळाली.

धनंजय महाडिक यांना मिळालेली मतं –

27+7+7 = 41

धनंजय महाडिक यांना 27 तर पियुष गोयल यांना 48 मते मिळाली. त्यातील 41 चा कोटा पूर्ण करत 7 अधिक मते. तर अनिल बोंडे यांना ही 48 मते मिळाली. त्यातील 41 चा कोटा पूर्ण करत 7 अधिक मते मिळाली. 27 अधिक पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांची 14 मते अशी धनंजय महाडिक यांना 41 मते मिळाली. यामध्ये महाडिक यांचा विजय झाला आहे.

भाजपचा गेम चेंजर नंबर गेम – (Rajya sabha Election 2022)

भाजपने महाविकास आघाडी समर्थक 6 अपक्ष आमदारांना फोडले आणि त्यांची पहिल्या पसंतीची मतं मिळवली. तसेच, तटस्थ असलेल्या मनसे 1 आणि बहुजन विकास आघाडीनेही त्यांची 3 मतं भाजपला दिली. अशी एकूण 10 मतं भाजपला अतिरिक्तं मिळाली. या नंबर गेमने भाजपच्या तीनही उमेदवारांना जिंकून दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.