Rajya Sabha elections : राज्यसभेची निवडणूक जाहीर; ‘या’ सहा जणांचा संपणार कार्यकाळ

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी (Rajya Sabha elections) 10 जून 2022 रोजी निवडणूक (Rajya Sabha elections) होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मे आहे.

भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह 15 राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण 57 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार असलेले केंद्रीय मंत्री पियुष गोयल, पी.चिदंबरम, प्रफुल्ल पटेल, डॉ. विकास महात्मे, संजय राऊत आणि डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांचा कार्यकाळ 4 जुलै 2022 रोजी संपत असल्याने राज्यातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. या जागांसह अन्य राज्यांतील राज्यसभेच्या एकूण 57 जागांसाठी 10 जून 2022 ला निवडणूक घेण्यात येणार असून याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.

Vaccination campaign : पुणे महानगरपालिकेच्या लसीकरण मोहिमेत उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा अडथळा

असा आहे निवडणूक कार्यक्रम! – Rajya Sabha elections

या निवडणुकांसाठी 24 मे रोजी निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. 31 मे ही अर्ज करण्याची अंतिम तारिख असून 1 जून रोजी अर्जांची छानणी होणार. 3 जून पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. 10 जून रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. 13 जून 2022 रोजी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.