Ravet News : इलेक्ट्रिक मोटरची बॅटरी ओव्हरहिट झाल्याने डॉमिनोज पिझ्झाच्या आउटलेटमध्ये आग

एमपीसी न्यूज – डॉमिनोज पिझ्झाच्या रावेत येथील आउटलेटमध्ये आग लागली. या आगीमध्ये दुकानातील साहित्य जळाले आहे. दुकानात इलेक्ट्रिक मोटर चार्जिंगला लावली होती. मोटरची बॅटरी ओव्हरहिट झाल्याने ही आग लागली. ही घटना गुरुवारी (दि. 23) सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली.

रावेत येथे डॉमिनोज पिझ्झाचे डिलिव्हरी आउटलेट आहे. या आउटलेटमध्ये बुधवारी रात्री इलेक्ट्रिक मोटर चार्जिंगला लावली होती. त्या मोटरची बॅटरी ओव्हरहिट झाली आणि त्यामुळे आग लागली. ही आग संपूर्ण आउटलेटमध्ये पसरली. सकाळी आठ वाजता पिंपरी-चिंचवड अग्निशमन केंद्राला या घटनेची माहिती देण्यात आली.

आगीची माहिती मिळाल्यानंतर मुख्य अग्निशमन केंद्र आणि प्राधिकरण उपकेंद्र असे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आउटलेटचे शटर उचकटून काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. मात्र अग्निशमन विभागाचा एक जवान किरकोळ जखमी झाला आहे. आउटलेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.