Ravet : ओव्हरटेक करणे पडले महागात; पीएमपीएमएल बसला धडकली दुचाकी, तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रस्त्यावर भरधाव वेगात दुसऱ्या गाड्यांना (Ravet)  ओव्हरटेक करणे हे महागात पडू शकते. असाच प्रकार बीआरटी रोडवर घडला असून ओव्हरटेक करण्याच्या नादात तरुणाची दुचाकी पीएमपीएमएल बसला धडकली; ज्यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला.  हा अपघात बुधवारी (दि.29) भोंडवेवस्ती येथील बीआरटी रोडवर घडला आहे.

याप्रकरणी पीएमपीएमएल चालकाने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या अपघातात अक्षय जयकुमार ओहोळ (वय 26 रा. चिंचवड) या तरुणाचा मृत्यू झाला.

Rahatani : महिलेच्या बँक खात्यातून परस्पर 5 लाख रुपये लंपास, दोघांविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील पीएमपीएमएल बस घेऊन बीआरटी रोडवरून जात होते. यावेळी अक्षय हा त्याच्या ताब्यातील दुचाकीवरून (Ravet)  बीआरटी रोडवरून दुसऱ्या दुचाकीला ओव्हरटेक करून वेगात येवून पीएमपीएमएल बसला धडकला. यात तो गंभीर जखमी झाला. या अपघातात अक्षयचा मृत्यू झाला असून रावेत पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.