Sanjay Raut Arrest : संजय राऊत यांना अटक

एमपीसी न्यूज – शिवसेनेची तोफ,उध्दव ठाकरे यांचे विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत यांना अखेर ईडीकडून अटक (Sanjay Raut Arrest) करण्यात आली आहे. काल दिवसभर झालेल्या चौकशीनंतर संजय राऊत यांना अटक करण्यात आली.

संजय राऊत यांना आज सकाळी साडेनऊ वाजता जे.जे.रुग्णालयात मेडिकल चेकअपसाठी घेऊन जाणार आहेत. सकाळी साडेआकरा वाजता संजय राऊत यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. रविवारी साकळी सातपासून ईडीच एक पथक संजय राऊत यांच्या भांडुपमधील मैत्री या बंगल्यात ठाण मांडून होतं. दिवसभर चौकशी केल्यानंतर राऊतांना रात्री उशिरा 11.38 वाजता अटक (Sanjay Raut Arrest) करण्यात आली.

संजय राऊत यांना नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने ताब्यात घेतले. राऊत यांच्या घरी रविवारी सकाळीच ईडीचे पथक दाखल झाले होते. दुपारी चारच्या सुमारास त्यांना ईडीने ताब्यात घेतले. अधिक चौकशीसाठी संजय राऊत यांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले.

त्यानंतर सव्वासहाच्या दरम्यान 11 लाख 50 हजार रुपयांची रोकड संजय राऊत यांच्या घरातून जप्त करण्यात आली. त्याचबरोबर व्हायरल आडीओ क्लिप प्रकरणी राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला.तर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.