Marital humiliation : ‘तेरी झलक अशरफी’ म्हणत विवाहितेचा विनयभंग, गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : दक्षिणात्य चित्रपट पुष्पा राज याची क्रेझ तरुणाईमध्ये (Marital humiliation) अजूनही असल्याचे दिसून येते. पुण्यात मात्र या चित्रपटातील गाणे म्हणत एका विवाहित महिलेचा विनयभंग करण्यात आला. वारजे माळवाडीतील न्यू अहिरे गावात हा प्रकार घडला.

याप्रकरणी स्वप्निल अरुण वांजळे (वय 30) नामक तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 36 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. आठ मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला आणि आरोपी स्वप्नील वांजळे हे एकाच परिसरात राहण्यासाठी आहेत. आठ मे रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी या भाजीपाला घेऊन बिल्डिंगच्या खाली आले असताना आरोपीने त्यांच्याकडे बघून ‘ए ए असे म्हणत तेरी झलक शर्फी’ हे गाणे म्हणत फिर्यादी यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न केली. पोलिसांनी (Marital humiliation) या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस नाईक शेलार अधिक तपास करत आहेत.

Pune News : पुण्यात सराईत गुंडांचा धुडगूस सुरू, सिंहगड रस्ता परिसरात दुकानदारांना मारहाण करून दहशत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.